अबब! ६०० किलो चांदी, ४ किलो सोनं आणि बरंच काही... इतकी आहे जयललितांची संपत्ती

आकडा पाहून व्हाल अवाक्

Updated: Jul 30, 2020, 09:30 AM IST
अबब! ६०० किलो चांदी, ४ किलो सोनं आणि बरंच काही... इतकी आहे जयललितांची संपत्ती  title=
संग्रहित छायाचित्र

चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबतच्या अनेक चर्चा कायमच लक्ष वेधून घेतात. त्यांच्या खासगी आयुष्यापासून ते अगदी राजकीय कारकिर्दीपर्यंत सर्वच बाबतीत 'थलायवी' प्रकाशझोतात असायच्या. सध्या जयललिता यांचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे हे म्हणजे अशाच एका कारणामुळं. 

हे कारण आहे त्यांची गडेगंज संपत्ती Jayalalitha Assets. जयललिता यांच्या जीवशैलीबाबत अनेकांनाच उत्सुकता होती. त्यातही आता त्यांच्या घरात असणाऱ्या अशा काही गोष्टींची माहिती समोर आली आहे, जी पाहून अवाक् व्हायला होत आहे. त्यांचं आयुष्य हे कोणा एका महाराणीपेक्षा कमी नव्हतं हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. 

पॉईस गार्डन स्थित जयललिता यांच्या निवासस्थानी चल- अचल संपत्तीशिवाय इतर गोष्टींच्या यादीमध्ये जवळपास ४ किलो सोनं, ६०१ किलो चांदी, ८३०० हून जास्त पुस्तकं आणि १०,४३८ हून जास्त ड्रेस शिवाय पूजेचं साहित्य यांचा समावेश आहे. शिवाय इतरही काही गोष्टी यात नमूद करण्यात आल्या आहे. राज्य सरकारनंच याबाबतची माहिती जाहीर केली. 

२०१६ मध्ये जयललिता यांचं निधन झालं. त्यापूर्वी त्या 'वेद निलयम' या तीन मजली निवासस्थानी राहत होत्या. पुढं २०१७ मध्ये त्यांच्या या निवासस्थानाला स्मारकामध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या आलिशान निवासस्थानाचं स्मारक करण्यासाठी ही संपत्ती पुरात्वी थलैवा डॉ. जे. जयललिता फाऊंडेशनकडे सोपवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याकडे यासंबंधीची अध्यक्षता असेल. 

राज्य सरकारकडून मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार जयललिता यांच्या बंगल्याच्या परिसरात असणारे दोन आंब्याचे, एक फणसाचं, पाच नारळाचे आणि पाच केळ्याचे वृक्षही समाविष्ट आहेत. त्यांच्या चल संपत्तीचा आकडा पाहिला तर तो ३२,७२१ इतका आहे. 

जयललिता यांचा भाचा आणि भाची सांगत आहेत संपत्तीवर हक्क.... 

एकिकडे जयललिता यांच्या संपत्तीनं सर्वांनाच धक्का दिला आहे. ज्याच्या आधारे आता राज्यसरकारनं स्मारक उभं करण्याचा निर्णयही घेतला आहे. पण, दुसरीकडे मात्र जयललिता यांची भाची आणि त्यांचा भाचा मात्र या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, या दोघांनीही या संपत्तीवर हक्क सांगितला आहे. इतकंच नव्हे, तर माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी स्वत:ला क्लास 2 चे वैध वारस म्हणून घोषित केलं आहे.