प्रणब मुखर्जींची प्रकृती आणखी ढासळली; अद्याप व्हेंटिलेटरवरच

प्रणब मुखर्जी यांना १० ऑगस्टला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Updated: Aug 11, 2020, 08:54 PM IST
प्रणब मुखर्जींची प्रकृती आणखी ढासळली; अद्याप व्हेंटिलेटरवरच title=

नवी दिल्ली: भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती आणखी ढासळल्याची माहिती समोर आली आहे. प्रणब मुखर्जी यांच्या मेंदुची १० ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशातच त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. यानंतर त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवरर) ठेवण्यात आले होते. तेव्हापासून प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेले नाही. त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे मंगळवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याची माहिती दिल्लीतील लष्करी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. 

प्रणब मुखर्जी यांना १० ऑगस्टला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची तपासणी झाली असता त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रणब मुखर्जी यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीचे वृत्त कळताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या मुलगी श्रर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे चौकशी केली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रणब मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली होती.