सिरसा : बलात्कार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीत यांची बँक खाती पोलिसांनी सील केली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या 504 बँक खात्यांमध्ये सुमारे 75 कोटींची संपत्ती मिळाली आहे. त्याचबरोबर सिरसामध्ये 1435 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
हरियाणा सरकारच्या तपासणीमध्ये डेराच्या या संपत्तीचा खुलासा झाला आहे. असे म्हटलं जातंय की राम रहीमच्या 12 बँक खात्यांमध्ये 7 कोटी 72 लाख रूपये मिळाले आहेत. तसेच हनीप्रीतच्या सहा बँक खात्यांमध्ये एक कोटी रुपये मिळाले आहेत. राम रहीमच्या प्रोडक्शन कंपनीचे देखील अनेक बँक खातीही आढळली आहेत.