Weird Marriage: सध्या सोशल मीडियावर अनेक लग्नासंबंधीचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल (Marriage Viral Photos) होत असतात. कधी कधी अतरंगी लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओजही व्हायरल होयला वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्यासमोर कधी कोणती गोष्ट समोर येईल याचाही काही नेम नाही. सध्या अशाच एका व्हायरल स्टोरीनं (Viral Story) सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. तशी ही गोष्ट अनेकदा आपल्यासमोर आली आहे. त्यामुळे आपल्यालाही यामध्ये फार काही अप्रुप कदाचित वाटणार नाही परंतु ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. एक पुरूष अनेक महिलांसोबत लग्न (Male Marrying Multiple Women) करतो अश्या बातम्या आपण अनेकदा पाहिल्या असतील. त्यामुळे आपल्याला अश्या बातम्या परत परत ऐकायला मिळाल्या तर त्यात काही नवल वाटतं नाही. त्यामुळे अशा काही बातम्यांची आपण थट्टाचं उडवतो परंतु आपण जर का असं काही ऐकलं की एकाच महिलेनं अनेक पुरूषांची लग्न केलंय? तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. (fraternal polyandry practice in these areas where a woman marries multiple men in one house)
होय, हे खरं आहे. एकाच घरात भावांसोबत एकाच महिलेनं लग्न केले आहे. त्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. ही गोष्ट बहूपती (Woman Marrying Multiple Men) परंपरेशी संबंधीत आहे. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे बहुपती लग्न फार फेमेस आहेत. तिथलीच ही एक घटना आहे. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या लग्नात घरातील सर्वात मोठ्या भावाला पत्नीसोबत वेळ घालवता येतो आणि मग त्यानंतर इतर भावंडं त्याच्यासोबत वेळ घालवतात.
तिबेटमध्येही (Tibet) ही परंपरा आहे अशी माहिती कळते. काही समाजशास्त्रज्ञांचे असे मतं आहे की, जगातील अनेक भागांमध्ये ही प्रथा रूढ आहे. त्याला Fraternal Polyandry असं इंग्रजीत बोलू शकतो. काही भागांमध्ये ही प्रथा कमी झाली आहे परंतु त्यातूनही तिबेट, हिमाचल प्रदेश, चीनच्या काही गावांमध्येही ही प्रथा आहे असं समोर आलं आहे.
यामध्ये आई-वडिलांच्या मर्जीविरूद्ध कोणीही लग्न करत नाही. त्याचबरोबर येथे एकाच पत्नीपासून घरातील भावंडांना मूल होते. असं म्हणतात की यामुळे कोण कोणाचा मुलगा आहे हेही कळून येत नाही. त्याचबरोबर येथे घरातील लहान भावाला तर अशा लग्नांमध्ये घेतले जात नाही. त्यातून जर का तो थोडा मोठा झाला असेल तर त्याला अशा लग्नांमध्ये घेतले जाते.
अशी माहिती समोर येते की, येथे घरातील जमीन वाटपापासून आणि टॅक्सपासून (Tax) वाचण्यासाठी अशा प्रकारे लग्न केली जातात.