Free Tablets For Students: विद्यार्थ्यांना 'हे' सरकार देणार मोफत टॅबलेट

 Free Tablets For 10th And 12th Students: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हे टॅबलेट वाटप करण्यात येणार आहे.

Updated: May 3, 2022, 08:43 AM IST
Free Tablets For Students: विद्यार्थ्यांना 'हे' सरकार देणार मोफत टॅबलेट title=

मुंबई : Free Tablets For Students: हरियाणा सरकार विद्यार्थ्यांना मोफत टॅब देणार आहे. 5 मे पासून राज्यातील 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप केले जाईल. हरियाणा सरकारने यााबत अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार टॅबलेटमध्ये शिकवण्याचे सॉफ्टवेअर प्री-लोड केले जाईल आणि पाच लाख विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट डेटाही दिला जाईल.

5 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट 

हरियाणा सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'डिजिटल इंडिया' मोहिमेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकार  पाच लाख विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि मोफत डेटा प्रदान करेल. सरकारी शाळांमध्ये शिकणारे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

मोफत टॅबलेट वाटपाच्या कार्यक्रमाला CM उपस्थित राहणार 

5 मे रोजी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या टागोर सभागृहात मोफत टॅबलेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हेही उपस्थित राहणार आहेत.

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळणार 

रोहतक शहरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जातील, असे हरियाणा सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याच दिवशी राज्यभरातील 119 ब्लॉकमध्ये टॅबलेट वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मंत्री, खासदार, आमदार आणि इतर पाहुणे मोफत टॅबलेटचे वाटप करणार आहेत.

३३ हजार पीजीटींनाही मोफत टॅबलेट देणार

असे सांगितले जात आहे की, क्लासमध्ये शिकवणाऱ्या सर्व 33,000 PGT ला मोफत टॅबलेट देखील दिले जातील. इतर खालच्या वर्गासाठी टॅबलेटची तरतूद नंतर टप्प्याटप्प्याने केली जाईल.