१ एप्रिलपासून तुमच्या खिशाला कात्री, पाहा काय-काय महागणार?

१ एप्रिलपासून एसीपासून विमानप्रवासापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलनंतर तुमच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित. त्यामुळे आताच तुमची काही खरेदी राहिली असेल, तर करून टाका.

Updated: Mar 26, 2021, 04:04 PM IST
१ एप्रिलपासून तुमच्या खिशाला कात्री, पाहा काय-काय महागणार? title=

बई : १ एप्रिलपासून एसीपासून विमानप्रवासापर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलनंतर तुमच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित. त्यामुळे आताच तुमची काही खरेदी राहिली असेल, तर करून टाका.

कार बाईक होणार महाग

कार किंवा बाईक घ्यायचा जर तुमचा प्लॅन असेल, तर तो आताच पूर्ण करा. कारण १ एप्रिलनंतर बहुतांश कंपन्या कार/बाईकचे दर वाढवणार आहेत. मारूती, निसानसारख्या कंपन्यांनी तर दरवाढ करण्याचे घोषितही केले आहे. 

टीव्हीसाठी जास्त खर्च करावा लागणार

गेल्या ८ महिन्यांमध्ये टीव्हीच्या किंमती आधीच ३ ते ४ हजार रूपयांनी महागलेल्या आहेत. त्यात १ एप्रिलनंतर टीव्हीच्या किंमतीत आणखी २ ते ३ हजार रूपयांनी वाढ होणार असल्याचं निश्चित आहे. टीव्ही उत्पादकांनी टीव्हीला PLI scheme मध्ये आणण्याची मागणीही केली आहे. 

एसी, फ्रीजसाठीही मोजावे लागणार जास्त पैसे

उन्हाळा वाढत चालला आहे, त्यामुळे तुम्ही एसी किंवा फ्रीज घेऊ इच्छित असाल, तर त्याच्या किंमती आताच पाहा. कारण १ एप्रिलनंतर एसी कंपन्यांनी किंमती वाढवण्याचा प्लॅन आधीच करून ठेवलाय. ४ ते ६ टक्क्यांनी या किंमती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रति युनिट एसीच्या किंमती १,५०० ते २ हजाराच्या घरात वाढणार आहेत. 

विमानप्रवासही महागणार

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेलं वर्ष तर तुम्ही घरीच असाल. पण आता जर तुम्ही फिरण्याचा विचार केला असेल, आणि त्यात विमानप्रवास करणार असाल, तर तुमचा खर्च वाढणार आहे. 

कारण १ एप्रिलनंतर Aviation security fees वाढणार आहे. देशांतर्गत विमानप्रवासासाठी हे शुल्क २०० रूपये होणार आहे. सध्या १६० रूपये शुल्क आकारले जाते. तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी हे शुल्क ५.२ डॉलरवरून १२ डॉलरवर जाणार आहे. १ एप्रिलपासून हे दर लागू होतील.