राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात केलं दाखल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शुक्रवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडली.

Updated: Mar 26, 2021, 02:29 PM IST
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात केलं दाखल title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची शुक्रवारी सकाळी अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कराच्या रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांची रुटीन तपासणी करण्यात आली आहे.'

सैन्य रुग्णालयाने वैद्यकीय बुलेटिन जारी करत म्हटलं आहे की, 'भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना छातीत दुखत असल्याने त्यांना आज सकाळी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात आणले गेले आहे. त्याची नियमित तपासणी केली गेली व त्यांची प्रकृती स्थिर आहे.'

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 3 मार्च रोजी सैन्य रुग्णालयातच कोरोना लसीचा पहिली डोस घेतला होता. राष्ट्रपती आपल्या मुलीसह सैन्य रुग्णालयात पोहोचले होते आणि तेथे त्यांनी लस घेतली. यानंतर त्यांनी लसीकरण मोहीम यशस्वीपणे देशभर राबविल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेविकांचे आभार मानले आणि इतर लोकांनाही लसी घेण्यासाठी आवाहन केले होते.