इस्त्रो २७ मिनिटांत १४ सॅटेलाइट्स लॉन्च करणार

२७ मिनिटांत १४ उपग्रह अवकाशात पाठवले जाणार 

Updated: Nov 24, 2019, 11:11 AM IST
इस्त्रो २७ मिनिटांत १४ सॅटेलाइट्स लॉन्च करणार title=
संग्रहित फोटो

चेन्नई : आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.२८ वाजता, भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन रॉकेटमधून (PSLV) अवघ्या २७ मिनिटांत १४ उपग्रह अवकाशात पाठवले जाणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आपल्या PSLV-XLसह १४ उपग्रह अवकाशात पाठवेल. तेथे प्रामुख्याने भारताचे १,६२५ किलोग्राम कार्टोसॅट -३ उपग्रह असेल तर अमेरिकेचे १३ नॅनो उपग्रह देखील पाठवले जाणार आहेत. 

पाच वर्षांपासून काम करणाऱ्या कार्टोसॅट  -३ या उपग्रहाला पीएसएलव्ही रॉकेट सर्वात आधी केवळ १७ मिनिटांत कक्षेत स्थापन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, कार्टोसॅट -३ हा तिसऱ्या पिढीतील प्रगत उपग्रह आहे. याची हाय रिजोल्यूशन इमेजिंगची क्षमता आहे. नागरी नियोजन, ग्रामीण स्रोतांचा विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास, किनारपट्टीवरील जमीन वापर आणि इतर मागण्यांसाठी हा उपग्रह छायाचित्र घेण्यास सक्षम असेल.