सामान्यांना दिलासा, ३ दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त

...

Updated: Jun 19, 2018, 10:56 AM IST
सामान्यांना दिलासा, ३ दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त title=
File Photo

मुंबई : इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण, इंधन दरवाढ थांबली असून आता पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होत आहे. पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पाहूयात कुठल्या शहरात किती रुपयांनी स्वस्त झालं पेट्रोल.

राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८ पैसे प्रति लिटर घट झाली आहे. तर, डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाहीये. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ७६.३५ रुपये झाली आहे. तर, दिल्लीत एक लिटर डिझेलचा दर ६७.८५ रुपये झाला आहे. सलग तीन दिवस दर स्थिर राहील्यानंतर तेल कंपन्यांनी ही कपात केली आहे. 

पेट्रोलचा दर 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.२७ रुपये प्रति लिटर झाला आहे. कोलकातामध्ये ७८.९४ रुपये, मुंबईत ८४.०६ रुपये आणि चेन्नईत ७९.१६ रुपये प्रती लिटर झाले आहेत.

डिझेलचा दर

डिझेलच्या दराचं बोलायचं झालं तर, दिल्लीत डिझेलचा दर प्रती लिटर ६७.७८ रुपये झाला आहे. कोलकातामध्ये ७०.३३ रुपये, मुंबईत ७२.१३ रुपये आणि चेन्नईत ७१.५४ रुपये प्रति लिटर झाला आहे.