डान्स करता-करता स्टेजवरुन तोंडावर पडला हा व्यक्ती, पुढे काय घडलं पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो.

Updated: Sep 29, 2021, 08:37 PM IST
डान्स करता-करता स्टेजवरुन तोंडावर पडला हा व्यक्ती, पुढे काय घडलं पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा करतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून काळी काळसाठी तुमच्या काळजाचा ठोका चूकेल परंतु नंतर तुमचे हसून हसून पोट दुखायला लागेल.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओंपैकी एक असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा डान्स रेकॉर्ड केलेला आहे.

हा व्यक्ती स्टेजवर असा काही डान्स करण्यात गुंग असतो की, त्याचा नाचता नाचता स्टेजवरुन तोल जातो आणि हा व्यक्ती तोंडावर पडतो. तो तोंडावर पडल्यामुळे तुम्हाला काही काळासाठी भिती वाटली असेल की, या माणसाला आता खूप लागले असणार. तुम्ही इथे चिंता करत राहाता परंतु हा व्यक्ती क्षणाचाही वेळ न घालवता पुन्हा उठतो आणि नाचू लागतो, जे पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरनार नाही.

हा व्यक्ती कदाचीत कोणत्यातरी लग्नात किंवा कोणत्यातरी सार्वजनीक कार्यक्रमात नाचत असावा. हा व्हिडीओ फार जुना असल्याने त्याची फारशी काही माहिती मिळू शकली नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की, नशा केल्याने किंवा दारु प्यायाल्याने या व्यक्तीला तो काय करतोय याचे थोडं ही भान नाही.