रील्स बनवताना मुलीचा मोबाईल पडला पाण्यात, ते पाहिल्यानंतर तुम्ही पोटधरून हसाल...

Girl Funny Video: इंस्टाग्रामवर रील्स बनवण्याचा प्रयत्न करताना, मुलीसोबत असे काही घडते, ज्यामुळे व्हिडीओ पाहणारे प्रत्येकजण पोटधरून हसत आहेत. 

Updated: Mar 28, 2022, 11:05 AM IST
रील्स बनवताना मुलीचा मोबाईल पडला पाण्यात, ते पाहिल्यानंतर तुम्ही पोटधरून हसाल... title=

मुंबई : Girl Funny Video: आजकाल लोक इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे reels व्हिडिओ शेअर करत असतात. आजच्या तरुणाईमध्ये रिल्सवर व्हायरल होण्याची क्रेझ जास्त आहे.  अनेकवेळा मोबाईलवर व्हिडीओ शुट करताना काहीना काही अपघात घडत असतात. परंतू काही अपघात हे हास्यास्पद ठरतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओ बनवताना मोबाईल पाण्यात

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

)

व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मुलगी दिसत असेल. इंस्टाग्राम रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतानाच या मुलीसोबत असे काही घडते, ज्यामुळे तिला स्वतःवरच खूप हसते. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी पाणी वाहत असलेल्या ठिकाणी रील बनवायला जाते. मुलगी मोबाईलचा कॅमेरा ऑन करून स्टँडमध्ये ठेवते आणि मागे वळून नाचू लागते. दरम्यान, तिचा फोन पाण्यात पडतो.

मुलीला मोबाईल पाण्यात पडल्याची माहितीच ती पुढे जाऊन डान्स करते. खरे तर तिचा मोबाईल स्टँडसह पाण्यात पडलेला असतो. आपला डान्स रेकॉर्ड होत आहे असे तिला वाटते. परंतू डान्स संपल्यानंतर ती मागे वळून पाहते तर, तिला मोबाईल दिसतच नाही. त्यावेळी ती स्टॅंडसह मोबाईलला उचलून पाण्यातून बाहेर काढते. आणि स्वतःवरच हसते.

लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ 

इन्स्टाग्रामवर असे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये व्हिडीओ बनवताना मजेदार किस्से घडत असतात.
 मोबाईल_फोटोग्राफी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.