G20 मध्ये पंतप्रधानांसमोर 'BHARAT';ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?

BHARAT Vs INDIA: जी 20 संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2023, 02:15 PM IST
G20 मध्ये पंतप्रधानांसमोर 'BHARAT';ना घटनादुरुस्ती, ना कोणताही कायदा, तरीही बदलले देशाचे नाव?  title=

BHARAT Vs INDIA:  भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी  G20 परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने याची सुरुवात झाली. यावेळी त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' हा नारा दिला. जी 20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असलेल्या नावाच्या पाटीवर देशाचं नाव 'भारत' असं लिहीलंय. देशाच्या नावातला इंडिया हा उल्लेख वगळून भारत उल्लेख करण्याची सध्या चर्चा रंगली आहे. जी २० संदर्भातल्या राष्ट्रपतींच्या आमंत्रणावरही इंडियाऐवजी भारत असाच उल्लेख होता. त्यात आता प्रत्यक्ष परिषदेतही पंतप्रधान मोदींच्या नावासमोरील पाटीवर भारत असं लिहीलंय. यामुळे देशभरात चर्चा रंगू लागल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया. 

कोणताही कायदा न आणता किंवा कोणतीही घटनादुरुस्ती न करता ‘भारत’ नावाचा वापर करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणून राज्यघटनेतून INDIA हा शब्द काढून टाकला जाऊ शकतो, अशा अनेक चर्चा यापूर्वी झाला होत्या. असे असले तरी केंद्र सरकारने याबाबत कोणतेही औपचारिक निवेदन दिलेले नाही. दरम्यान केंद्राच्या अधिकाराच्या अख्त्यारित येते, असेही सांगितले जाते. इंडियावरुन भारत नाव वापरण्यासाठी कायदा करावा लागतो. इंडियाचे नाव भारत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. याचेच हे प्रतिक आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

G20 परिषदेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या डिनर कार्यक्रमासाठी भारताच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निमंत्रणातदेखील 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिल्याने हा सर्व वाद सुरू झाला होता. यावर विरोधकांनी टिका केली होती. 

भारत नावाने सर्वांनाच आश्चर्य 

जी-20 परिषदेच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी भाषण सुरू केले. तेव्हा त्यांच्यासमोर लावलेल्या नेम प्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पट्टीवर इंग्रजीत BHARAT लिहिले होते. सरकारने कोणतीही घटनादुरुस्ती न करता भारताऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात करावी, असे संकेतही अलीकडे दिले जात होते. आता सरकार त्याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. यापूर्वी ब्रिक्स परिषदेतही भारत हे नाव वापरण्यात आले होते. 

भाजपचे खासदार नरेश बन्सल यांनी काही दिवसांपूर्वी  संविधानात इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) नाव करण्याची मागणी राज्यसभेत केली होती. त्यानंतर काहीच दिवसात इंडियाऐवजी भारत असा उल्लेख राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेवर करण्यात आल्यानं राजकारण तापले होते. तर सरसंघचालक मोहन भागवतांनीही यापूर्वीच इंडियाऐवजी भारत असा उल्लेख झाला पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे भारत नाव करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागलीय. दरम्यान भाजपविरोधी गटाने आपल्या आघाडीला INDIA हे नाव दिले आहे. देशभरातील विविध राज्यातील भाजप विरोधी पक्ष या नावाखाली एकत्र आले आहेत. 

परिषदेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन युनियनला G20 मध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. आता आफ्रिकन युनियनचे 55 देश देखील G20 चा भाग बनले आहेत आणि हा शक्तिशाली गट आणखी मोठा झाला आहे.