गणेश चतुर्थी : संपूर्ण पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त

जाणून घ्या सर्व माहिती 

गणेश चतुर्थी : संपूर्ण पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त

मुंबई : 13 सप्टेंबर रोजी म्हणजे अवघ्या 1 दिवसाने गणराज विराजमान होणार आहेत. बाप्पाचं आगमन होण्याआधी खूप जय्यत तयारी असते. मग ती त्याच्या साफसफाईचे असो वा त्याच्या पूजेची. गणेशोत्सवात दरवर्षी आपण गणरायाची नवी मूर्ती दरवर्षी घरी घेऊन येतो. 

स्थापनेची योग्य पद्धत 

बाप्पाचे आगमन होण्याअगोदर ज्या ठिकाणी गणपती विराजमान होणार तो परिसर आणि संपूर्ण घर स्वच्छ साफ करावे. त्यानंतर लाल कपडा घावून त्यावर अक्षता पसरून ठेवा आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी. त्यानंतर गणपतीला दूर्वांनी आंघोळ घालावी. पिवळ्या रंगाचे गणपतीला अर्पण करावेत. त्यानंतर गणपतीची मनोभावे पूजा करून , फूल चढवावीत आणि नैवेद्य दाखवावा. 

पूजेची सामुग्री अशी ठेवा 

गणेश मूर्तीसमोर चांदी आणि तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. कलश गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवा. या कलशाच्या खाली अक्षता ठेवा. गणपतीच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा तेवत ठेवा. दिव्याच्या खाली देखील अक्षता ठेवा. आणि पूजेच्या दोन्ही वेळा निश्चित करा. 

बाप्पाच्या स्थापनेनंतर एक संकल्प करा 

आपल्याला माहित आहे, अनेक जण आपला नवस पूर्ण झाला की, बाप्पाची स्थापना करतात. त्याचप्रमाणे बाप्पाची स्थापना करता उजव्या हातात अक्षता आणि जल घेऊन संकल्प करा. त्यावेळी बाप्पाशी संवाद साधा की, मी बाप्पाची एवढे दिवस मनोभावे पूजा करेन. दररोज पूजा करेन आणि यथा सांग पद्धतीने आराधना करेन 

बाप्पाच्या पूजेची योग्य वेळ 

गणरायाची स्थापना सकाळी केली जाते. मात्र ही पूजा सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. पण भाविक ही पूजा सकाळी करणंच योग्य समजतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी 13 सप्टेंबरपर्यंत दुपारी 12 पर्यंत गणपतीची पूजा करून घेऊया.