आयकर विभागाचा छापा, 19.30 कोटींची रोकड जप्त

आयकर विभागाला आलं मोठं यश

Updated: Sep 12, 2018, 02:15 PM IST
आयकर विभागाचा छापा, 19.30 कोटींची रोकड जप्त

अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबाद येथील स्‍टॉक ट्रेडिंगशी संबंधित एका व्यक्तीच्या घरी आयकर विभागाने छापा मारुन 19.3 कोटींची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या रोकडमध्ये 2000, 500 आणि 100 च्या नोटांचा समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असलेल्या आयकर विभागाच्या छाप्यांमधला हा मोठा छापा असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी जिग्‍नेश शाह आणि पार्श्‍व शाह यांच्या चौकशीनंतर अहमदाबाद येथील 6 ठिकाणी छापे मारले. हा सगळा पैसा जिग्‍नेश शाहच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, 'घरामध्ये पैसे लपवण्यासाठी कोठेच जागा नव्हती. सगळी रोकड बेडरूममधून जप्त करण्यात आली आहे.