gap between teeth is lucky sign : दातांची योग्य ठेवण आपल्या सुंदरतेमध्ये भर घालते. एका रेषेत असणारे दात नेहमीच सर्वांना हवेहवेसे असतात. दात सरळ नसतील वेडेवाकडे असतील किंवा त्यामध्ये गॅप असेल तर चारचौघात वावरताना आत्मविश्वास ढासळलतो. मग त्यासाठी आपण महागड्या ट्रीटमेंट्स घेतो , डेंटिस्टकडे लाखो पैसे घालवतो. पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या दातात असणारा गॅप तुम्हाला नशीबवान बनवू शकतो. हो हे खर आहे. कारण समुद्री शास्त्रानुसार काही गोष्टींचा संबंध तुमच्या भाग्याशी जोडलेला असतो. चाल तर जाणून घेऊया दातांवरून कस ठरतं तुमचं नशीब..
असतात भाग्यवान
ज्या लोकांच्या दातांमध्ये गॅप असतात असे लोक खूप भाग्यवान असतात अश्या व्यक्तींना आयुष्यभर कुठल्याही प्रकारे धनाची कमी भासत नाही. काही लोक सुंदर दिसण्यासाठी दातांमधील गॅप कमी करून घेतात मात्र समुद्री शास्त्रानुसार असं करण योग्य नाहीये.
तल्लख बुद्धिमत्त्ता
ज्या व्यक्तींच्या दातात गॅप असतो असे व्यक्ती बुद्धीने तल्लख असतात फार हुशार असतात, मुत्सदेगिरीत माहीर असतात. विरोधकांचा यांच्यासमोर अजिबात टिकाव लागत नाही. कोणीही यांचं काहीच वाकड करू शकत नाहीत.
नेहमी मिळतं यश
अशा व्यक्ती ज्या ज्या कामात डोक्याचा वापर करतात त्या व्यक्तींना त्या त्या कामात हमखास यश मिळत. कुठल्याही अडचणीत सापडले तरी त्यातून बाहेर पडण्याचा अचूक मार्ग अशा व्यक्ती शोधून काढतातच.