लग्नमंडपात सिलेंडरचा स्फोट ; २० जखमी, ३ मृत्यूमुखी

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 17, 2018, 09:02 PM IST
लग्नमंडपात सिलेंडरचा स्फोट ; २० जखमी, ३ मृत्यूमुखी title=

अजमेर : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आनंदाचा दिवस. मात्र त्यादिवशी झालेल्या धमाक्याने या आनंदावर पाणी फेरले. चांद चितार रस्त्यावरील नंदनगर परिसरातील एका धर्मशाळेत शुक्रवारी एक लग्नसोहळा सुरू होता. मात्र तिथे झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे जवळपास २० लोक जखमी झाले तर ३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पुरूष आणि १ महिलेचा समावेश आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत ४ महिला अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. 

जबरदस्त स्फोट

या घटनेची खबर लागताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली. त्याचबरोबर आयुक्त गौरव गोयल आणि ग्रामीण एसपी देखील घटनास्थळी पोहचले. तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुडल्या.

२० जखमी, ३ मृत्युमुखी

जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची संख्या २० असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला.