पंढरपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक 'खोचक' सल्ला दिलाय.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने सैन्याची अप्रतिष्ठा झाली आहे... आता सरकारने या संघवाल्यांना हाफ चड्डी आणि हातामध्ये काठी देऊन सीमेवर रक्षणासाठी पाठवावे, असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला.
पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली शेतकरी मेळाव्यात हा आरोप केलाय. यावेळी पवार यांनी नीरव मोदी प्रकरणावरुनही केंद्र सरकावर टीका केलीय.