Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च (Google Search) इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते. पण काही व्यक्ती गुगल सर्चचा चुकीचा वापर करतात. अश्लिल गोष्टी किंवा समाजाला घातक ठरणाऱ्या गोष्टींसाठी गुगलची मदत घेतली जाते. पण असं करणं महागात पडू शकतं. गुगलवर तुम्ही काय शोधताय यावर नजर ठेवली जाते. याच संबंधी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यातर शिक्षा होऊ शकते? याचबरोबर सामान्य ज्ञान (Genral Knowledge) वाढवण्यासाठी काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न तुम्हाला स्पर्धात्मक परिक्षेत उपयोगी ठरु शकतात. चला तर मग तयार व्हा अचूक उत्तरं द्यायला
प्रश्न : मच्छारांचा उत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो?
उत्तर : मच्छारांचा उत्सव चीन देशात साजरा केला जातो
प्रश्न : कोणत्या देशाचे कायदे सर्वात कठोर मानले जातात?
उत्तर : साऊदी अरब या देशाचे कायदे जगात सर्वात कठोर मानले जातात.
प्रश्न : कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा चलनात वापरल्या जातात?
उत्तर : ऑस्ट्रेलियात प्लास्टिकच्या नोटा चलनात वापरल्या जातात
प्रश्न - कोणत्या देशाचे नागरिक भारतात पर्यटन करु शकत नाही?
उत्तर : उत्तर कोरियाचे नागरिक भारतात फिरू शकत नाहीत
प्रश्न : सफरचंदाच्या किती बिया खाल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
उत्तर : सफरचंदाच्या 80 हून अधिक बिया खाल्यास माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. पण याबाबत स्पष्टता नाही.
प्रश्न : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास शिक्षा होऊ शकते?
उत्तर : गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. यामुळे तुरुंगावासही होऊ शकतो. उदाहरणार्थ गुगलवर बॉम्ब बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात हे शोधणं गंभीर गुन्हा ठरु शकतो. सुरक्षा संस्थांकडून यावर कठोर नजर ठेवली जाते. याशिवाय लहान मुलांसंबंधी पोर्नोग्राफी शोधणंही कायद्याचं उल्लंघन करणारं आहे. हँकिंग संदर्भात सॉफ्टवेअर शोधणंही कायद्याने गुन्हा आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधीत माहिती शोधणंही गु्न्हेगारी श्रेणीत येतं. काही देशात अश्लील व्हिडिओ शोधण्यावरही प्रतिबंध आहे.