जेव्हा तिने १८०० कोटी रुपयांची लॉटरी, फक्त छोट्याशा चुकीने गमावली

सुमारे 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता, परंतु तिच्यासोबत जी घटना घडली हे ऐकल्यावर कोणीही तिच्यावर हसेल आणि तुम्हाला तिची कीव येईल.

Updated: Mar 3, 2021, 04:55 PM IST
जेव्हा तिने १८०० कोटी रुपयांची लॉटरी, फक्त छोट्याशा चुकीने गमावली title=

मुंबई : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 19 वर्षांच्या विद्यार्थीनीचे आयुष्य पूर्णपणे बदलणार होते, परंतु तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे तिच्या सर्व आशांवर पाणी फिरलं. राचेल केनेडीने असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. तिने सुमारे 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता, परंतु तिच्यासोबत जी घटना घडली हे ऐकल्यावर कोणीही तिच्यावर हसेल आणि तुम्हाला तिची कीव येईल.

एका वृत्तानुसार, ब्राइटन विद्यापीठात पदवीधर शिक्षण घेत असलेली राचेल केनेडी दर आठवड्याला एका ठराविक अंकाची लॅाटरी काढायची आणि या आठवड्यात त्याच अंकाचा जॅकपॉट लागला. राचेल केनेडी म्हणाली की हे कळल्यावर तिला खूप आनंद झाला, परंतु थोड्याच वेळाने तिला निराश व्हावे लागले. हे घडले कारण राचेलने या आठवड्यात तिकिटचं विकत घेतले नाही.

राचेलच्या म्हण्यानुसार, या आ़ठवड्यात मी खूप व्यस्त राहिल्यामुळे मला लॉटरीचे तिकीट विकत घेता आले नाही. राचेलचा प्रियकर लियाम याने  ट्विटरवर याबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले- जेव्हा तुमची मैत्रीण यूरो न खेळण्याचा निर्णय घेते आणि तिला लॉटरी लागते तेव्हा. ( When your girlfriend decides not to play Euro million and gets her lottery.)

तसेच लियामने या टि्वटसह आणखी एक फोटो टि्वट केले, या फोटोत राचेलचे तिकिट दिसत आहे. ती लॉटरी तिने गेल्या आठवड्यातच खरेदी केली होती आणि त्या लॉटरीवर तोच नंबर छापलाला होता, ज्यावर जॅकपॉट होता. विशेष म्हणजे शुक्रवारी स्वित्झर्लंडकडून हे युरो मिलियन्स जॅकपॉट देण्यात आले होते.

राचेलच्या म्हणण्यानुसार असे होण्यामागे नक्कीच काही कारण असेल. अशा परिस्थितीत, मी आशा करतो की ज्याने ही लॉटरी जिंकली आहे, त्याला याची अधिक गरज असेल.  होय, हे माझ्यासाठी खूप निराशजनक आहे. पण मला माहित आहे की मी, लवकरच ही घटना विसरेन.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x