मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. आज गेल्या 10 महिण्यांतील सर्वात कमी दर नोंदवण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि कोरोना काळात अनेकांनी सोन्यात गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यावेळी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारांतील उलथापालथीमुळे सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.
मुंबईत आज (3 मार्च) रोजी सोन्याचे दर 45,370 प्रतितोळा इतके होते. ही दर गेल्या 10 महिन्यांतील सर्वात कमी दर आहे. सोन्याच्या कमी झालेल्या दरांचा फायदा गुंतवणूक दारांना होऊ शकतो.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमती कमी होत आहेत. लॉकडाऊन काळात सोन्याचे भाव 55 हजार प्रतितोळा पेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे आता सोन्याच्या भावात झालेली घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी आहे.
गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक कुटूंबांनी लग्न कार्यांचे नियोजन पुढे ढकलले होते. अशा असंख्य कुटूंबांनी या लॉकडाऊनमध्ये लग्न कार्याचे नियोजन केले आहे. आपल्या राज्यात लग्नसमारंभांमध्ये सोने खरेदीला महत्व दिले जाते. त्यामुळे सोने खरेदीचे नियोजन असलेल्या कुटूंबांसाठी सोन्यात झालेली घसरण दिलासा देणारी आहे.
22 कॅरेट | 24 कॅरेट | |
3 मार्च | 44,370 | 45,370 |
2 मार्च | 44,420 | 45,420 |
1 मार्च | 44,940 | 45,940 |
28 फेब्रुवारी | 44,930 | 45,930 |
27 फेब्रुवारी | 44,940 | 45,940 |
26 फेब्रुवारी | 45,740 | 46,740 |