मुंबई : गुगलमुळे आयुष्य अगदी सोपं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. नुकताच गुगलने आपल्या सर्च रिझल्टचा अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये महिलांच्या इंटरनेट वापराशी संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामध्ये 75% महिला 15-34 वयोगटातील आहेत. याशिवाय गुगलवर मुली काय शोधतात हे जाणून घेणे तितकचं मजेशीर असणार आहे. तर आज जाणून घेवू मुली किंवा महिला रात्री एकांतात काय सर्च करतात.
करियर संबंधित अनेक पर्याय
रिपोर्टनुसार, मुली लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी असतात, त्या आपल्या करिअरला जास्तीत जास्त महत्त्व देतात. अशा मुली इंटरनेटवर यासंबंधीची माहिती शोधतात. ज्यामुळे कोणत्या क्षेत्रात आपल्याला फायदा होवू शकतो किंवा कोणता कोर्स करायचा.. इत्यादी गोष्टी मुली गुगलवर सर्च करतात.
ऑनलाईन शॉपिंग सर्च
याशिवाय मुली ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन कपड्यांचे डिझाईन, नवीन कलेक्शन, ऑफर्स याबद्दल इंटरनेटवर जास्त सर्च करतात. अनेक संशोधनात ही बाब समोर आली आहे.
ब्युटी टिप्ससाठी घेतात इंटरनेटची मदत
मुलींना सुंदर आणि वेगळं दिसायला आवडतं. यासाठी त्या इंटरनेटची मदत घेतात. मुलींना फॅशन, ट्रेंड, ब्युटी ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय शोधायला आवडतात.
रोमँटिक गाण्यांची असते आवड
सहसा प्रत्येकाला गाणी ऐकायला आवडतात. पण गुगलवर मुलींनी सर्वाधिक शोधलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे संगीत. मुली इंटरनेटवर खूप रोमँटिक गाणी शोधतात आणि ऐकतात. यासोबतच मुली इंटरनेटवर रोमँटिक शायरी देखील शोधतात.