बंगळूरु : वर्षाच्या सुरूवातीस म्हणजेच १ जानेवारी जन्माला येणं हे खास मानल जात. हा दिवस प्रत्येकाच्याच लक्षात राहणारा असतो. पण आता हा दिव अजूनच स्पेशल होणार आहे. कारण या दिवशी जन्मलेल्यांना ५ लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शिक्षणाचा महत्त्व लक्षात घेता बंगळूरू सरकारने हा निर्णय घेतला आहे. बंगळूर महापालिकेच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीस ही रक्कम मिळणार आहे.
५ लाखाची रक्कम मुलीच्या पालकांना मिळणार नसून ती मुलीच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे. यामाध्यमातून मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाणार आहे.
महापालिका आयुक्त आणि मुलीच्या संयुक्त खात्यात ही रक्कम ठेवली जाईल.