Suchna Seth Murder Case: सूचना सेठ प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलमध्ये तिच्या चार वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन टॅक्सीने बंगळुरू येथे निघाली. मात्र, मध्येच पोलिसांनी तिचा डाव उधळून लावत तिच्यावर कारवाई करत तिला अटक केली. सूटना सेठवर अटकेची कारवाई केल्यानंतर ती निर्दोष असल्याचा दावा तिने व तिच्या घरच्यांनी केला आहे. तसंच, हे सिद्ध करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी कोर्टात ती मानसिकरित्या अस्थिर असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता गोवा पोलिसांनी कोर्टात सूचनाच्या मेंटल असेसमेंटचे अहवाल सादर केला आहे. ज्यात आश्चर्यचकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत.
सीईओ सूचना सेठने मानसिक विकारामुळं तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली? तसंच, याच कारणामुळं तिने तिच्या मुलाची हत्या करुन हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला का?, असे सवाल उपस्थित होत होते. हॉटेलच्या खोलीत मुलाची हत्या करुन तिने ज्या प्रकारे मुलाचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. तसंच, सर्व आरोप फेटाळत राहिली. ते पाहून एका क्षणाला पोलिसांनाही वाटले की ती मानसिकरित्या अस्थिर आहे. मात्र आता सूचनाच्या मानसिक स्थितीबाबत वैदयकीय अहवाल समोर आला आहे. यामुळं सर्व प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत.
वैद्यकीय अहवालात स्पष्टपणे लिहलं आहे की, सूचनाची मानसिक स्थितीत कोणताही बिघाड झालेला नाहीये. मेंटल हेल्थ असेसमेंटमध्ये कोणत्याची सायकोपॅथॉलॉजिकल प्रकरणाची संदर्भ समोर आलेले नाहीयेत. तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी तर्कसंगत पद्धतीने दिले आहेत. यामुळं ती मानसिक रोगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवा पोलिसांनी चिल्ड्रेंस कोर्टात या प्रकरणी जबाब दाखल केला आहे. इंस्टीट्यूट ऑफ सायकियाट्रीक अँड ह्युमन बिहेवियर म्हणजेच आयपीएचबी बंबोलिमच्या अहवालाचा हवाला दिला आहे. ज्या अहवालात सूचनाच्या मानसिक स्थितीबाबत तज्ञांनी आपले मत व्यक्त केले. या अहवालात असे म्हटले आहे की, सूचनाच्या मानसिक स्थिती तपासणीमध्ये सायकोपॅथॉलॉजी म्हणजेच मानसिक आजाराची कोणतीही बाब समोर आलेली नाही. या अहवालात असेही म्हटले आहे की, सध्या सूचना यांना तिचे जीवन संपवण्याची इच्छा नाही किंवा तिच्यात आत्महत्येची प्रवृत्तीही नाही. त्यामुळं सूचनाने आत्महत्येचा बनाव रचल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.