पणजी : गोव्यात मध्यरात्री राजकीय घडामोडी घडल्या आणि सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांची आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांची उपमुख्यमंत्री पदावरुन उचलबांगडी करताना त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यांना थेट मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. दरम्यान, मध्य रात्री 'मगो'चे दोन आमदार भाजपमध्ये दाखल झालेत. 'मगो'चे तीन आमदार होते. त्यापैकी दोन आमदार रात्री भाजपमध्ये दाखल झालेत. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात मोठी फूट पडली आहे. आता पक्षाचे सुदिन ढवळीकर हे एकमेव आमदार आहेत.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गोव्यात वेगाने राजकीय घडामोडी घडल्यात. गोव्यात भाजपची सभागृहातील संख्या दोनने वाढून १४ झाली आहे. काँग्रेसचेही १४ आमदार आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपला गोवा जनतेने नाकारले होते. तरीही फोडाफोडीचे राजकारण करत गोव्यात भाजपने सत्ता स्थापन केली. आता गोव्यात 'मगो'चे दोन आमदार आपल्या गळाला लावून भाजपने आपले स्थान अधिक बळकट केले आहे. तर सत्तेत सहभागी असणारे आणि उपमुख्यमंत्रीपद भुषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना आज मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात याचीच जोरदार चर्चा आहे.
MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar in a letter to the Speaker of Goa Legislative Assembly: We have agreed to merge Maharashtrawadi Gomantak Legislative Party (MGP) with BJP. Total strength of Legislators of MGP is three members & we constitute 2/3rd of the members. pic.twitter.com/b2JWoX7SEi
— ANI (@ANI) March 26, 2019
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
Goa CM Pramod Sawant on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: Two MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar have joined BJP for the stability of the government. Automatically, our strength has grown to 14. pic.twitter.com/ByF838ftOk
— ANI (@ANI) March 26, 2019
मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी मंगळवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्र सादर केले. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी या पत्रावर सही केलेली नाही. सुदीन ढवळीकर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन्ही आमदार भाजपत आल्याने गोव्यातील भाजप सरकार आता स्थिर झाले आहे. गोवा विधानसभेत ३६ सदस्य आहेत. आता काँग्रेस आणि भाजपची संख्या सारखीच झाली आहे.
Goa Tourism Minister & MGP MLA Manohar Ajgaonkar after merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: The next government will be formed by BJP because wherever he (PM Modi) goes, people say Modi, Modi. Because of Modi, BJP has developed in Goa. pic.twitter.com/UYyM4D7vG3
— ANI (@ANI) March 26, 2019