नवी दिल्ली : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक व्यक्ती आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा बळी ठरला आहे.
२९ वर्षीय यासीर अहमद बाशाच्या म्हणण्यानुसार, पत्नीच्या उपचारासाठी त्याने ७ लाखांचं कर्ज घेतलं होतं. फक्त रिक्षा चालवून ते परत फेड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अधिक पैसे कमवण्यासाठी तो मुंबईला आला. २०१४ मध्ये येथे कॅब चालवल्यानंतर ही उत्पन्न तेवढं मिळतं नव्हतं. म्हणून नोकरीचा शोध सुरु केला.
नोकरीच्या शोधात यासीर हळूहळू आंतरराष्ट्रीय किडनीच्या रॅकेटमध्ये फसला. याबाबत त्याला कोणतीही माहिती नव्हती. "रोजगारासाठी अहमदाबादमधील शिक्षा कन्सलट्न्सीला संपर्क केला. ही संस्था सुरेश प्रजापती चालवत होता.
यासीरने सांगितलं की जेव्हा तो पहिल्यांदा अहमदाबादला गेला तेव्हा त्याला रक्ताचे नमुने मागितले. नंतर सांगितलं की आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये जॉबसाठी याची आवश्यकता असते. यानंतर त्याला कैरो पाठवण्यात आलं आणि तेथे एका किडनी रॅकेटमध्ये फसवलं गेलं. तेथे त्याला किडनी विकण्यासाठी मजबूर करण्यात आलं.
यासीर आता पुन्हा भारतात परतला आहे. पण तो आपल्या पत्नीपासून लांब राहत होता कारण त्याला भीती होती की एक दिवस ही गोष्टी तिला कळेल की त्याची एक किडनी काढून घेण्यात आली आहे.