नवी दिल्ली : सोनं दरात सोमवारी वाढीची नोंद झाली. सोन्या-चांदीच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली आहे. सकाळी जवळपास 10 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 76 रुपयांच्या वाढीसह 46,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचलं आहे. MCXवर चांदी 696 रुपयांच्या वाढीसह 50,814 रुपये प्रति किलोवर गेलं आहे.
दिल्लीत सोन्या-चांदीचे सर्वात मोठे घाऊक बाजार 1 जूनपासून सुरु होणार होते. परंतु ज्येलर्स संघटना द बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने 31 मे रोजी बैठक घेऊन 7 जूनपर्यंत दुकानं सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्या-चांदीचं दुकानं सुरु करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरला जाणार आहे.
सोन्याचे दर सध्या 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार, 2021 पर्यंत सोन्याचे दर 80 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतात. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज विश्लेषकच्या अंदाजानुसार, 2021च्या शेवटापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारा सोन्याचे दर औंसनुसार ठरतात. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम वजन असतं. त्यामुळे एक ग्रॅम सोन्याची किंमत 8075 रुपये इतकी असते. त्यानुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार 753 रुपये इतकी होते.
कोरोना व्हायरसमुळे जागतिक आर्थिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. जाणकारांकडून सतत सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचं सांगण्यात येत आहे. आर्थिक संकटावेळी गुंतवणूकांची पहिली पसंती सोन्याला असल्याचंही जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.