सोनं-चांदीच्या दरात झाली वाढ

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 25, 2017, 07:23 PM IST
सोनं-चांदीच्या दरात झाली वाढ title=
Representative Image

नवी दिल्ली : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

लग्नसराईमुळे सोनं-चांदीची मागणी वाढली

सध्या लग्नसराईमुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सोन्याच्या किंमतीत वाढ

सोनं आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

सोन्याचा प्रति तोळा दर

सोमवारी सोन्याच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे सोन्याचा दर २९,८७५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचल्याचं पहायला मिळालं.

चांदीच्या दरातही झाली वाढ

तर, तिकडे चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे चांदीचा दर ३८,७०० रुपयांवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: २९,८७५ रुपये आणि २९,७२५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारी सोन्याच्या दरात १६५ रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता २५ रुपयांनी वाढ झाली आहे.