Gold Price Today: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याबाबत मोठी घडामोड

Gold and Sliver Price Today: सध्या लग्नसराईच्या आणि सणासुणीच्या मुहूर्तावर सराफा बाजारातून (Big Update in Gold Price Today) मोठी घडामोड समोर येते आहे. त्यातून आता येत्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता (Gold Price Forecast) आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अधिकीचे (Gudi Padwa Gold Price) पैसे मोजावे लागणार आहेत.

Updated: Mar 18, 2023, 11:04 AM IST
Gold Price Today: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याबाबत मोठी घडामोड  title=
Gold and sliver Price Today on the occasion of gudipadwa gold and sliver price rises see the full details

Gold and Sliver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव (Gold Rate 2023) वाढू लागले आहेत. यंदाच्या मौसमात सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळते आहे. सध्या सणासुदीचा मोहोल आहे त्यातून आपल्यापैंकी अनेकांच्या घरी लग्नसभारंभही (Wedding Season in India) असतील. येत्याच्या काळात पुन्हा एकदा सोन्याच्या भावांना मध्यमवर्गीयांची (Middle Class) झोप उडवली आहे. आता सोन्याचे भाव पुन्हा गगनाला भिडले आहेत. त्यातून सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. काही दिवसांवरच गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) सण आहे. (Gold and sliver Price Today on the occasion of gudipadwa gold and sliver price rises see the full details)

सोन्याच्या संदर्भात मोठी बातमी (Breaking News in Gold Price)

या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ झाल्याची पाहायला मिळते आहे. सोनं आता कालच्यापेक्षा अधिक जास्त किमतींनी वाढले असून आता तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी अधिक पैसे (Gold Price Hike) मोजावे लागणार आहेत. सध्या लग्नसराईचा मोहोल जोरदार आहेत त्याचबरोबर जर का अद्याप तुम्ही सोनं खरेदी (Buying Gold) केली नसेल तर तुम्ही आधी ही बातमी वाचणे आवश्यक ठरेल. 

काय आहेत आजचे दर? (Today Gold Price)

समोर आलेल्या माहितीनुसार, सोन्याचे भाव हे 60 हजारांच्या पार गेले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 60 हजार रूपये प्रति तोळा (Pure Gold) असून सोन्याच्या भावानं उच्चांक गाठला आहे. पुण्यामध्ये करांसहित सोन्याचे दर हे 62 हजार प्रति तोळा इतके झाले आहेत. मुंबईतही सोन्याच्या भावानं उच्चांक गाठला आहे. आज शनिवारी 18 मार्चला सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहे. कालच्या भावापेक्षा 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 1,630 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या मध्यमवर्गीयांना सोन्याच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. काल म्हणजे 17 मार्च रोजी शुद्ध सोन्याचे भाव हे 58,690 रूपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. आता हेच भाव 60 हजाराच्या पार पोहचले आहेत. 

दोन दिवसांत मोठी वाढ (Gold Price Hike in 2 Days)

15 मार्च रोजी सोन्याच्या दरात घसरण पाहायाल मिळाली होती परंतु दुसऱ्या दिवशी ही किंमत 550 रूपयांनी वाढली. त्यानंतर 17 मार्चला म्हणजे काल ही वाढलेली किंमत आणखीन 270 रूपयांनी वाढली आणि आज सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वाढ पाहायला मिळते आहे. तेव्हा येत्या काही दिवसानंतर काय चित्र असेल हे येणारा काळच ठरवेल.