Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण वाचा पटापट आजचे दर

Updated: Sep 24, 2021, 03:54 PM IST
Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर

मुंबई: भारतीय सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 24 ते 14 कॅरेट सोन्य़ाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुऴे ग्राहकांची पावलं पुन्हा एकदा सोनं खरेदीसाठी सराफ बाजाकडे वळताना दिसत आहेत. आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये 438 रुपयांनी घट झाली आहे. 

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन 24 कॅरेट सोनं 438 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी 113 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुरुवार आणि शुक्रवारचे सोन्याचे दर नेमके कसे आहेत जाणून घेऊया. 14 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने आता नागरिकांचा पुन्हा एकदा सोनं खरेदीसाठीचा उत्साह वाढला आहे. कोरोनामुळे सोन्याचे दर गेल्यावर्षी वाढले होते. त्यामुळे लोकांची सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर दुसरीकडे आता दिवळीपर्यंत पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

24 ते 14 कॅरेट गुरुवारचे सोन्याचे दर कसे आहेत?
 
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 24 कॅरेट  गुरुवारचे दर- 46,694
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 23 कॅरेट  गुरुवारचे दर- 46,507
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 22 कॅरेट गुरुवारचे दर - 42,772
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 18 कॅरेट गुरुवारचे दर- 35,120
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 14 कॅरेट गुरुवारचे दर- 27,393       
 
24 ते 14 कॅरेट शुक्रवारचे सोन्याचे दर कसे आहेत?
 
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 24 कॅरेट शुक्रवारचे दर - 46,256
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 23 कॅरेट शुक्रवारचे दर - 46,071
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 22 कॅरेट शुक्रवारचे दर- 42,370
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 18 कॅरेट शुक्रवारचे दर- 34,692 
सोनं (प्रति 10 ग्रॅम) 14 कॅरेट शुक्रवारचे दर- 27,060 
 
22 ते 13 सप्टेंबर कसे आहेत 24 कॅरेट सोन्याचे दर
 
22 सप्टेंबर 2021- 24 कॅरेट सोन्याचे दर 46,360 ( 30 ) 
21 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,330 ( 200 ) 
20 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,130 ( -260 ) 
19 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( 0 ) 
18 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( 0 )
17 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,390 ( -390 ) 
16 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 46,780 ( -550 ) 
15 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,330 ( 330 )
14 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,000 ( -10 ) 
13 सप्टेंबर 2021 24 कॅरेट सोन्याचे दर 47,010 ( -60 )