मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्व असते. जर तुम्ही देखील ज्वेलरी खरेदी कऱण्याचा विचार करीत असाल किंवा गुंतवणूक करण्याच विचार करीत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आज सोने स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम सोने आता तुम्ही 47 हजार 438 रुपयांना खरेदी करू शकता.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर आज सोन्याचा दर 47 हजार 438 प्रतितोळे रुपयांना बंद झाला. आज सोन्याचे भाव दिवसभर काही प्रमाणात स्थिर होते. 70 ते 100 रुपये कमी जास्त ट्रेड होत होते. याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे.
22 कॅरेट 44850 प्रतितोळे
24 कॅरेट 45850 प्रतितोळे
चांदीचे मुंबईतील आजचे भाव 70 हजार 500 प्रति किलो आहेत.
---------------------------------------------------------
(वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)
केडिया कमोडिटीच्या डायरेक्टर अजय केडिया यांच्या मतानुसार, सोन्यात येत्या काळात तेजी येण्याचे संकेत आहेत. जगभरातील कमी व्याजदरे, कोरोनाच्या बाबतीतील अनिश्चितता, अधिक लिक्विडिटीमुळे महागाईत वाढ, ईटीएफमध्ये खरेदी, केंद्रीय बँकांची सोन्यात खरेदी, डॉलरच्या किंमतीत घसरण, देशांमध्ये जिओ - पॉलिटिकल तणाव इत्यादी कारणांमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याच्या किंमती 60 हजार प्रतितोळे पर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.