Gold | ही संधी सोडू नका; सोन्याच्या दरांत घसरणीमुळे सराफा बाजारात गर्दी

Gold rate today | सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईत सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. गुढीपाडव्यानंतर नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त आहेत. 

Updated: Apr 6, 2022, 03:20 PM IST
Gold | ही संधी सोडू नका; सोन्याच्या दरांत घसरणीमुळे सराफा बाजारात गर्दी title=
मुंबई : सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच लग्नसराईत सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. गुढीपाडव्यानंतर नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त आहेत.  या दिवसांमध्ये सोनं खरेदीला ग्राहक पसंती देतात. रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 आठवड्यांपूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. परंतू सध्या सोन्याच्या दरांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे.
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याचे आजचे दर 51710 रुपये प्रति तोळेने इतके होते. तर चांदीचे दर 66333 रुपये प्रति किलो इतके आहे.  MCX वर सोन्याच्या दरांमध्ये किंचीत वाढ दिसून येत असली तरी, गेल्या 3 आठवड्यांच्या तुलनेत हे दर कमी आहेत. रशिया युक्रेन युद्धादरम्यान, सोन्याच्या दरांत वाढ झाली होती. 
 
मुंबईमध्ये सोन्याच्या दर 52,140 रुपये प्रति तोळे इतके होते. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरांमध्ये बदल झालेला नाही. तर मुंबईतील चांदीचे दर देखील 66200 रुपये प्रति किलो इतके होते.
 
सोने-चांदी खरेदीसाठी उत्तम काळ
तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याची वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. जागतिक बाजारपेठेत रशिया-युक्रेन युद्धामुळे सातत्याने घसरणीचे वातावरण होते. सध्या बाजारपेठेची स्थिती हळूहळू सुधारत आहे.
 
देशात सणासुदीच्या काळात तसेच लग्न समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची मागणी वाढते. त्यामुळे सोन्याच्या कमी झालेल्या दरांचा फायदा या ग्राहकांना होऊ शकतो.