सणासुदीला दागिने खरेदीचा विचार करताय? आज सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोनं खरेदीचा विचार करताय तर आज जाणून घ्या किती आहेत सोनं-चांदीचे दर  

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 20, 2024, 11:30 AM IST
सणासुदीला दागिने खरेदीचा विचार करताय? आज सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर  title=
Gold price fall and Silver price gains today 20 august 2024 check latest price

Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर सोनं खरेदीचा हा चांगला दिवस ठरु शकतो. वायदे बाजारात आज मौल्यवान धातुमध्ये नरमाई आल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारातदेखील सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. वायदे बाजारात आज सोनं 120 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर, चांदीने आज MCX वर 202 रुपयांची उसळी घेतली असून आज प्रतिकिलो चांदी 84,540 रुपयांवर स्थिरावली आहे. 

आतंरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुंच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 72,650 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांनी घसरले आहेत. आज 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 66,600 रुपयांवर स्थिरावलं आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांत सोन्याची मागणी वाढत जाते. त्यामुळं सोनं खरेदीसाठी तुम्ही आजचा दिवस निवडू शकता. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  66,600  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  72,650 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54, 490 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 660 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 265 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 449 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 280 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 120 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 592 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 66,600  रुपये
24 कॅरेट- 72,650 रुपये
18 कॅरेट- 54, 490 रुपये