Gold Price: सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले, दरात 8800 रुपयांची घसरण, आजचा भाव पाहा

 Gold Price Today, 27 July 2021: सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले. सोने किमतीत 8800 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.  

Updated: Jul 27, 2021, 02:24 PM IST
Gold Price: सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले, दरात 8800 रुपयांची घसरण, आजचा भाव पाहा title=

मुंबई : Gold Price Today, 27 July 2021: सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले. सोने किमतीत 8800 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. इंट्रा डे दरम्यान सोने 47420 रुपयांवर घसरले आणि 47784 रुपयांचा उच्चांक गाठला. म्हणजेच हा व्यवसाय केवळ 350 रुपये रेंजमध्ये झाला. शेवटी सोन्याचे वायदे जवळपास फ्लॅट बंद झाले. गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोने दरात प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

आजही सोने दरात काहीही बदल झाला नाही. बाजारात जरा मंदी दिसून आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोने 10 ग्रॅम 475 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. 

या आठवड्यात सोने  (26-30  जुलै)

दिवस                  सोने (MCX ऑगस्ट वायदा)      
सोमवार                 47461/10 ग्रॅम
मंगलवार               47400/10 ग्रॅम (ट्रेडिंग )

सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात थोडासा बदल दिसून येत आहे. मात्र, चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. एक किलो चांदीसाठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत. गेल्या सहा दिवसांचा विचार करता सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर पुढचे तीन दिवस सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीचा सोने खरेदीवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सोने गुंतवणूक कमी झाली आहे. तसेच डॉलर मजबूत झाल्याने या परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे सोने मागणीत घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सोने किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र,पुढील काळात सोने किंमतीत  वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोने किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अनेकांसाठी सोने गुंतवणूक करणे हा फायदेशीर आहे. त्यांच्यासाठी हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोनेच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. दरम्यान, सोने दरात घट होताना चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.