१० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजची किंमत

वर्षभरात सोन्याच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ   

Updated: Jul 21, 2020, 12:30 PM IST
१० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजची किंमत  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास बाजार उघडताच सोन्याच्या दरांनी चांगलीच उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचे दर ९३ रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४९,१२० रुपयांवर पोहोचले. 

MCX वर चांदीच्या दरांमध्येही कमालीची तेजी पाहायला मिळाली. १,१०१ रुपयांच्या तेजीसह प्रति किलोसाठी चांदीचे दर ५५,१०६ रुपयांवर पोहोचले. गेल्या काही काळापासून सोन्यासोबतच चांदीच्या दरांमध्येही चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उसळीमुळं भारतीय वायदा बाजारात चांदीचे दर सप्टेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच ५४००० च्या पलीकडे पोहोचले आहेत. 

 

वर्षभरात सोन्याच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ 

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ३९ हजारांच्याही पलीकडे पोहोचले होते. जे आता थेट ४९,५०० हा आकडा गाठत आहेत. सध्याच्या घडीला वायदा बाजारात सोन्याचे दर सातत्यानं ४९ हजारांच्याच घरात आहेत. हे दर पाहता आतापर्यंत वर्षभरात सोन्याच्या दरात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.