धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिवाळीच्या आधीच दागिने घेणे महागले

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 21, 2024, 11:35 AM IST
धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याने गाठला उच्चांक दर, चांदीही वधारली; 18, 22, 24 कॅरेटचे दर वाचा
Gold price today on 21th October 2024 gold and silver price gains check rates

Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधीच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात आज पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे. मागील काही सत्रात सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागच्या आठवड्यातही सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं महागलं आहे. चांदीदेखील सोमवारी 2,822 रुपयांनी महागलं आहे. यात 98,224 उच्चांकावर चांदी पोहोचली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

वायदे बाजारात आज सोनं-चांदीने उच्चांक गाठला आहे. आज MCXवर सोनं 220 रुपयांनी महागलं आहे. त्यामुळं 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,640 रुपयांवर स्थिरावला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 200 रुपयांनी महागले आहे. त्यामुळं 73,000 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 160 रुपयांनी वाढून 59,730 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीनेदेखील उच्चांकी दर गाठला आहे. चांदी आज 2.75 टक्क्यांनी 98,024 वर ट्रेड करत आहेत. तर, मागील व्यवहारात 95,402 वर स्थिरावली होती. 

पुढच्या आठवड्यात दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीतील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं खरेदी केली जाते. मात्र, यंदा दिवाळीच्या आधीच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तसंच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींना वेग आला आहे. त्याचा परिणामही सोनं-चांदीच्या किंमतीवर होत आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,000रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79,640 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,730 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,300 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 964 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 973 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,400 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63,712 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    59,730 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 73,000 रुपये
24 कॅरेट-  79,640 रुपये
18 कॅरेट-  59,730 रुपये

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More