दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचे दर पुन्हा वाढले; वाचा आजचे 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोनं वायदे बाजारात आज पुन्हा एकदा महागले आहे. जाणून घेऊया दर 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2024, 11:59 AM IST
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचे दर पुन्हा वाढले; वाचा आजचे 24 कॅरेटचे दर title=
Gold price today per 10 gram in india check latest price of 22 24 and 18 karat

Gold Price Today:  कमोडिटी बाजारात गेल्या आठवडाभरापासून सोन्याचे भाव कमी झाले होते. मात्र, आज शुक्रवारी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. सोनं वायदे बाजारात ट्रेडिंगमध्ये आहे. खरं तर सराफा बाजारात सोन्याच्या दरात काल घसरण झाली होती. त्यामुळं दसऱ्याला सोनं स्वस्त होणार का? असा सवाल चर्चेत होता. सणासुदीच्या दिवसांत सोनं स्वस्त व्हाव, अशी ग्राहकांची अपेक्षा होता. मात्र, दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच सोनं महागलं आहे. जाणून घेऊया किती आहेत सोन्याचे दर. 

आज सकाळी वायदे बाजारात MCX वर सोनं आज 760 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 77,400 रुपयांवर स्थिरावलं आहे. शनिवारी दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तर, आज चांदी 766 रुपयांने महागली असून 91,070 रुपयांवर स्थिरावली आहे. काल चांदी 90,304 रुपयांवर पोहोचली होती. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,950 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,400 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,050 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,095 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 740  रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 805 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,760 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,920 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,050 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 70,950 रुपये
24 कॅरेट- 77,400 रुपये
18 कॅरेट- 58,050 रुपये