नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मंदीनंतर शनिवारी सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. सणांमुळे वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींमुळे ही वाढ झाल्याचं बोललं जातंय. दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव २५० रुपयांनी वाढून ३०,९०० रुपये प्रती तोळा झाले आहेत. तर चांदीचे भाव ४०० रुपयांनी वाढून ३८,२५० रुपये किलो झाले आहेत. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३०,९०० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३०,७५० रुपये प्रती तोळा आहेत.
शुक्रवारी सोन्याचे भाव ३० रुपयांनी वाढले होते. तर ८ ग्रॅमच्या सोन्याच्या बिस्किटांचे भाव २४,५०० रुपयांवर कायम आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या भावांमध्येही वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या शिक्क्यांचा भाव ७२ हजार आणि ७३ हजार प्रती शेकडा आहे.