मुंबई: देशभरात नवरात्र उत्साहात साजरी करण्यासाठी तयारी सुरू आहे. याच नवरात्रीआधी एक आनंदाची बातमी आहे. नवरात्रीआधी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. MCX वर सोन्याचे 0.35 टक्क्यांनी घसरले आहेत. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46 हजार 600 रुपये आहे. तर वायदा बाजारात चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी घसरले आहेत.प्रति किलो सोन्यासाठी ग्राहकांना 60 हजार 623 रुपये मोजावे लागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. गेल्या वर्षभराच्या तुलनेत साधारण 10 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर उतरले आहेत. गेल्या वर्षी सोन्याचे दर 56 हजारहून अधिक होते. आता जवळपास 46 हजार रुपयांवर आले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची सोनं खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.
22 कॅरेट मुंबईत सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 45 हजार 680 रुपये आहेत. दिल्लीमध्ये 45 हजार 900 रुपये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 44,050 रुपयांवर पोहोचले आहेत. केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
24 कॅरेट सोन्याचे दर
चेन्नई- 48 हजार 060
मुंबई- 46 हजार 680
दिल्ली- 50 हजार 080
कोलकाता- 48 हजार 850
बंगळुरू- 47 हजार 730
हैदराबाद- 47 हजार 730
केरळ- 47 हजार 730
पुणे- 48 हजार 120