दसऱ्याआधीच वधारलं सोनं; वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव

Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीचे भाव वधारले आहे. काय आहेत आजचे दर जाणून घेऊया 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 21, 2024, 12:25 PM IST
दसऱ्याआधीच वधारलं सोनं; वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव title=
Gold Rate Rises In India Check 22 and 24 Carat Price

Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र, शुक्रवारी सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर आज शनिवारीदेखील सोन्याच्या दरात वाढ कायम आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. नवरात्र आणि दिवाळी तोंडावर असताना सोन्याचे भाव गडगडल्याने ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 75 हजारांवर पोहोचलं आहे. इतकंच नव्हे तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून प्रतिकिलो चांदी 93,000 वर पोहोचली आहे. 

सध्या भारतात पितृ पंधरवडा सुरू आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणं टाळलं जातं. मात्र, त्यानंतर येणारी नवरात्र आणि दसरा, दिवाळी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. अनेक भागात तर दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. अशातच सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज सोन्याने 75 हजारांचा पल्ला गाठला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 820 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचा भाव प्रतितोळा 75,930 रुपयांवर पोहोचला आहे. 

22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 69,600 रुपयांवर स्थिरावलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 620 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 56,950 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  69,600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  75,930 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  56, 950 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,960 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 593 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 695 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55, 680 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60, 744 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45, 560 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 69,600 रुपये
24 कॅरेट- 75,930 रुपये
18 कॅरेट- 56, 950 रुपये