सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!

Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव  

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 12, 2024, 11:44 AM IST
सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या! title=
Gold Rate Today 12th June 2024 price of gold and silver fall in maharashtra check latest rates

Gold Rate Today 12th June: बुलियन मार्केटमध्ये गेल्या काही आठवड्यात मंदी दिसून आली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात निर्णय येण्याआधीच दरात मंदीचे संकेत दिसत आहेत. भारतीय वायदे बाजारातही याचा परिणाम दिसून येत आहे. बुधवारी 12 जून रोजी MCXवर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 71,488 वर व्यवहार करत आहे.

चांदीच्या दरात ही आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. चांदी 367 रुपयांनी घसरून 89,030 वर व्यवहार करत आहे. काल चांदीचा व्यवहार 88,663वर बंद झाला होता. चांदी मागील आठवड्यात 96,600 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता चांदीचा भाव उतरला असून 90,000 वर आली आहे. महागाईचे आकडे आणि व्याज दरांच्या आधीच सोन्याच्या दरात थोडी नरमाई आलेली पाहायला मिळतेय. कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड 0.1% वाढून $2,312.70 प्रति औंसवर होते, तर फ्युचर्स मार्केटमध्ये ते $2,326.60 वर अपरिवर्तित राहिले. व्याजदर कपातीच्या वेळेबाबत फेडच्या बैठकीतून संकेत मिळू शकतात.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 71,440 रुपये इतका आहे. तर 65,440 रुपये इतका भाव 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव आहे. सोन्याच्या भावात आजही घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदीसाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे. 

24 कॅरेट सोन्याचे दर 

1 ग्रॅम-7,144
8 ग्रॅम- 57,152
10 ग्रॅम- 71,440

22 कॅरेट सोन्याचे दर

1 ग्रॅम-6,544
8 ग्रॅम-52,352
10 ग्रॅम- 65,440

मुंबई पुण्यात सोन्याचे दर

मुंबई- 71,850
पुणे- 71,850
नागपूर- 71,850