Gold Rate Today | सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली; जाणून घ्या आजचे दर

सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. 

Updated: May 30, 2022, 03:01 PM IST
Gold Rate Today | सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली; जाणून घ्या आजचे दर title=

मुंबई :Gold Price Today:सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. सकाळी 11 वाजता MCX वर सोन्याचा दर 122 रुपयांनी वाढला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर  122 रुपयांच्या वाढीसह सोने 51035 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करीत होते. त्याचबरोबर चांदीमध्येही चांगली तेजी नोंदवली गेली. चांदी 344 रुपयांनी वाढून 62460 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.

सराफा बाजारातही तेजी

सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांनीही गर्दी केली. देशात आज 24 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) सोन्याचा दर 51,200 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा (10 ग्रॅम) भाव 46,900 रुपये आहे. गेल्या 24 तासांत भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत चढ-उतार झाले.

मुंबईतील सोन्याच्या दर 52,090 रुपये प्रति तोळे इतके होते तर चांदीचे दर 62,200 रुपये प्रति किलो इतके होते. 

मिस्ड कॉल देऊन सोन्या-चांदीची किंमती जाणून घ्या

किरकोळ बाजारात सोन्याच्या दागिन्यांचा दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x