लागोपाठच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वाढले

मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

Updated: Aug 21, 2018, 08:00 PM IST
लागोपाठच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वाढले title=

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या घसरणीनंतर आता सोन्याचे भाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव १८० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचा आजचा भाव ३०,६०० रुपये प्रती तोळा झाला आहे. तर चांदीचा भाव ५० रुपये किलोनं वाढून ३८,१५० रुपये झाला आहे. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ३०,६०० आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०,४५० रुपये प्रती तोळा झाली आहे.

मागच्या आठवड्यात पडले होते भाव

मागच्या आठवड्यामध्ये दागिने विक्रेत्यांची कमी झालेली मागणी, कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार आणि सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली. मागच्या आठवडा भरामध्ये सोन्याचे भाव ४५० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीचे दर १ हजार रुपयांनी उतरले होते.