मुंबई : सणासुदीच्या काळात म्हणजेच शक्यतो दिवाळी किंवा दसऱ्याला लोकं सर्वाधीक सोनं खरेदी करतात. सणांवरांना हा पिवळा धातू खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. लग्नाचा हंगाम, नवरात्री, दुर्गा पूजा, धनत्रयोदशी आणि दिवाळी सारख्या सणांमुळे वर्षाच्या शेवटी सोन्याची मागणी मजबूत असते. या प्रसंगी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. लोक त्यांचं वय आणि उत्पन्नाची पर्वा न करता सोने खरेदी आणि गुंतवणूक करतात.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वा व्यतिरिक्त सोन्याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला जातो. कारण आर्थिक चढउतारांच्या काळातही ते त्याचे मूल्य देते, त्यामुळे सध्या लोकं त्यामध्ये गुंतवणूक करु लागले आहेत.
जर तुम्ही या सणासुदीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आधी सोन्याच्या कोणत्या प्रकारात गुंतवणूक करावी याचा विचार करावा. कारण सोन्याचे असे अने प्रकार आहेत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता आणि तुम्हाला हे माहित आहे का? की या वेगवेगळ्या प्रकारात पैसे गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला त्याचा वेगळवेगळा फायदा होऊ शकतो.
तुम्ही फिजिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड, सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड्स (एसजीबी) किंवा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची आहे हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
परंतु सोन्यामध्ये हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदाराने विचार करावा. ते दीर्घकालीन, विविधतेच्या दृष्टिकोनातून आणि महागाईच्या दृष्टिकोनातून गुंतवणे चांगले आहे.
सोन्यामध्ये गुंतवणूक फिजिकल गोल्ड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड या स्वरूपात करता येते. कर वाचवू पाहणारे गुंतवणूकदार गोल्ड फंडची निवड करू शकतात. या प्रकारच्या गुंतवणुकीवर टीडीएस लागू होत नाही. त्याऐवजी, हे दागिने खरेदी आणि विक्रीवर कर लावले जातात.
गुंतवणुकीची पद्धत ही गुंतवणूकदाराची गरज आणि जोखीम उचलण्यावरती अवलंबून असते. सोन्यामधील डिजीटल प्रकार हा त्या लोकांसाठी चांगला मार्ग आहे ज्या लोकांना, पोर्टफोलिओ डाइवेस्ट करायचा आहे. तसेच हे लॉग टर्म इनवेस्टमेंटसाठी देखील एक चांगला पर्याय आहे.
कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करण्याचा कल वाढला आहे. डिजिटल सोने हे सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक पूर्णपणे वेगळा मार्ग आहे. तुम्ही त्यात कमीत कमी 1रुपयांपासून गुंतवणूक करु शकता आणि ही सुविधा बाकी प्रकारांमध्ये येत नाही.
हे सहज खरेदी आणि विकले जाऊ शकते. या वैशिष्ट्यांमुळे, गुंतवणूकदार डिजिटल सोन्याकडे आकर्षित होत आहेत आणि त्यात गुंतवणूक करत आहेत. तसेच फिजिकल गोल्डबद्दल बोलायचे झाले तर, या सोन्याच्या देखभाल आणि सुरक्षिततेबद्दल नेहमीच चिंता असते.
या वर्षी कोविड -19 मुळे आणि अन्य गोष्टींचा विचार करुन लोकांनी डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करण्यावर भर दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर, तुम्ही डिजीटल पद्धतीचा वापर करा.