Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आज मात्र ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सोनं-चांदीच्या दरात थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर सोन्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तस, कॉमेक्सवरदेखील सोनं आणि चांदीच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळतेय. 24 कॅरेट सोन्याचा दर 73,750 रुपये इतका आहे. MCXवर आज चांदीचा दर प्रतिकिलोसाठी 87095 इतका आहे. सकाळी एमसीएक्सवर चांदीच्या दरात 205 रुपयांची घट झाल्याचे पाहायला मिळत होते.
सध्या ट्रेडर्सची नजर अमेरिकेच्या सेंट्रल बँकवर आहे. जून पॉलिसीमध्ये US FED व्याजदरांबाबत आपला निर्णय जारी करणार आहेत. याचा थेट परिणाम बुलियनसह अन्य बाजारांवरदेखील होणार आहे. पण सध्या महागाईचा दर जून पॉलिसीमध्ये फेडरेशनसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर सकाळी 9.40 मिनिटांपर्यंत 2,377.32 डॉलर इतका होता. यात 0.92 डॉलरपर्यंत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 0.04 पर्यंतची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या सोन्याच्या दरात थोडीफार घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शुक्रवारी सोन्याच्या दरातदेखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 73,750 रुपये 10 ग्रॅमसाठी आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 67,600 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 67,600 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73,750 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 55, 310 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,760 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,375 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,531 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 54,080 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 59,000 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 44,248 रुपये
22 कॅरेट- 67,600 रुपये
24 कॅरेट- 73,750 रुपये
18 कॅरेट- 55, 310 रुपये