Gold Price Today 5August 2022 : सोने चांदीच्या किंमतींमध्ये आज पुन्हा मोठे बदल झाल्याचे दिसून आले. सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी नोंदवली गेली. सोन्याच्या किंमती हळू हळू आतापर्यंतच्या उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. जागतिक बाजारवर चीन-तैवानमधील तणावाचा परिणाम दिसून येत आहे. बाजाराच्या सुरूवातीला एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींनी चांगलीच उसळी घेतली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 52 हजार 143 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करीत होते. तर चांदी 58 हजार रुपयांवर ट्रेड करीत होती.
विक्रमी उच्चांकापेक्षा 4,080 रुपये स्वस्त
सोने विक्रमी उच्चांकावरून 4,080 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. आज जर 24 कॅरेट सोन्याच्या किमतीची MCX च्या फ्युचर्स किमतीशी त्याच्या सर्वकालीन उच्च किंमतीशी तुलना केली, तर सोने त्याच्या विक्रमी उच्च मूल्यापेक्षा स्वस्त विकले जात आहे.
मुंबईत आज सराफा बाजारात 51,980 रुपये प्रति तोळे इतके रुपये होते तर, चांदीचे दर 58,200 रुपये प्रति किलो इतके होते.
तुम्हालाही सोन्या-चांदीचे रोजचे नवीन दर जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही ही माहिती घरबसल्या मिळवू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल.
तुम्हाला मोबाईल फोनवर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये देशातील सोन्या-चांदीच्या नवीनतम दरांची माहिती दिली जाईल.