Central Government employees DA Hike: पुढील एक-दोन महिन्यांच्या काळात केंद्रीय कर्मचार्यांना आनंदवार्ता मिळणार आहे. दिवाळीपर्यंत त्यांना केंद्र सरकारकडून एक गोड बातमी समोर येऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. पहिली आनंदाची बातमी म्हणजे, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस वाढणार आहे अशी माहिती आहे. तसेच दुसरे म्हणजे डीएच्या (DA) थकबाकीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, भविष्य निर्वाह निधीचे व्याज देखील EPFO कडून दिवाळीपर्यंत खात्यात जमा केले जाईल. त्यामुळे आगामी काळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुगीचा असणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही EPFO व्याजाचा लाभ मिळणार आहे.
सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यातही वाढ करण्याच्या विचारात आहे. यावर्षीच्या सप्टेंबर अखेरपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या महागाई भत्त्याचा दर 34 टक्के आहे. यामध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील काही काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच त्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारासह दोन महिन्यांची थकबाकीही मिळू शकते. सरकार नवरात्रीच्या काळात याची घोषणा करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीए मिळेल.
देशात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सणांच्या आधी ग्राहकांच्या EPF खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची शक्यता आहे. याची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळते. ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रत्येकाच्या खात्यात 8.1 टक्के दराने व्याज जमा केले जाईल. EPFO प्रत्येक आर्थिक वर्षासाठी EPF रकमेवर व्याज देते. चालू आर्थिक वर्षात 8.1 टक्के दराने व्याज निश्चित करण्यात आले आहे.
आता तुम्ही मिस कॉल करून तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यामध्ये नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात असलेल्या पीएफ पैशाची माहिती मिळेल.
Good news for central employees da rate increase epfo intrest know the pf balance