घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, 'या' ८ शहरांमध्ये घरांची विक्री घटली

तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 6, 2017, 10:09 PM IST
घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, 'या' ८ शहरांमध्ये घरांची विक्री घटली title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर तिमाहीत घरांच्या विक्रीत ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. रिसर्च फर्म प्रॉपइक्विटीच्या रिपोर्टनुसार, २०१७ च्या तिमाहीत आठ शहरांमध्ये २२,६९९ घरांची विक्री झाली आहे. तर गेल्या तिमाहीत हा आकडा ३४,८०९ होता.

ज्या आठ शहरांमध्ये गुडगाव, नोएडा, मुंबई, कोलकाता, पुणे, हैदराबाद, बंगळुरु आणि चेन्नई या शहरांचा समावेश आहे.

रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, लॉन्चिंगमध्ये जुलै-सप्टेंबर महिन्यात ८३ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या तिमाहीत २४,९०० यूनिट्स होते तर आता ४,१३३ आहे. याचं कारण म्हणजे डेव्हलपर्सचं फोकस RERA आणि GST याच्यावर राहीला.

प्रॉपइक्विटीचे सीईओ आणि फाऊंडर समीर जसुजा यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी फेस्टिव्ह सीजनची सुरुवात लवकर झाली आहे आणि रिअल इस्टेट खासकरुन मिड आणि अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये रिकवरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या रेडी टू मूव्ह इन आणि रिसेल प्रॉपर्टीज या दोघांची स्थिर मागणी आहे.

समीर जसुजा यांनी पूढे म्हटलं की, यंदाचा फेस्टिव्ह सीजन गेल्यावर्षीपेक्षा यंदा खूपच चांगला होऊ शकतो. डेव्हलपर्स अनेक प्रकारचे डिस्काऊंट आणि ऑफर्स देण्याची शक्यता आहे.