भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरला गुगलची आदरांजली

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आनंदीबाई जोशी यांना आदरांजली वाहिली आहे. डुडलच्या माध्यमातून आनंदीबाई जोशी यांना सलाम करण्यात आला आहे.

shailesh musale Updated: Mar 31, 2018, 01:11 PM IST
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टरला गुगलची आदरांजली title=

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांची आज 153 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आनंदीबाई जोशी यांना आदरांजली वाहिली आहे. डुडलच्या माध्यमातून आनंदीबाई जोशी यांना सलाम करण्यात आला आहे.

९ व्या वर्षी झालं लग्न

वयाच्या नवव्या वर्षी आनंदी यांचं 36 वर्षांच्या गोपाळ या विदुराशी लग्न झालं. मात्र गोपाळ हा प्रचंड द्रष्टे आणि काळाच्या पुढचा विचार करणारे होते. त्यांनी आनंदीला शिकवायला सुरुवात केली. स्वतः पोस्टात क्लार्क असूनही पत्नीच्या उच्चशिक्षणाची स्वप्न त्यांनी पाहिली. पतीच्या प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळे आनंदीबाई वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या. तिथं शिक्षण घेऊन पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान आनंदीबाई गोपाळ जोशी यांना मिळाला.

स्वप्न राहिलं अपूर्ण

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यातील एका सधन कुटुंबात झाला होता. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची डिग्री मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालायतून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या. पण दुर्देवाने आनंदीबाईंचं वयाच्या २२व्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला.