कोची : कोणतेही तंत्रज्ञान लोकांना जसे फायदेशीर ठरते तसेच काही वेळा त्यामुळे नुकसानही होऊ शकते करते. असाच काहीसा प्रकार केरळमधील एका कुटुंबासोबत घडला. हे कुटुंब गुगल मॅपचा वापरकरून मुन्नारहून अलप्पुझाला जात होते. गुगलने चुकीचा रस्ता दिल्याने त्यांची गाडी कालव्यात गेली. पंरतू वेळीच सावध झाल्याने प्रवाशांची जीवित हानी टळली.
गुगल मॅप हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर बहुतांश ड्रायव्हर्स कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना करतात. विशेषत: ज्या मार्गांवर तुम्ही प्रथमच प्रवास करत आहात आणि मार्ग माहीत नाही. गुगल मॅप सहसा सोपा आणि जॅम-फ्री मार्ग देऊन लोकांना निच्छित स्थळी घेऊन जातो.
परंतु काहीवेळा गुगल मॅपवर मार्ग शोधणे धोकादायक ठरते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहे.
असेच एक प्रकरण केरळमधील कडूथुरुथीचे आहे. येथे एका कुटुंबाची गाडी गुगलने दाखवलेल्या रस्त्याने जात असताना कालव्यापर्यंत आली. आजूबाजूच्या लोकांनी वेळीच संपूर्ण कुटुंबाला गाडीतून बाहेर काढल्याने मोठा अपघात टळला.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातील एक कुटुंब मुन्नारहून अलप्पुझाला जात होते. हे कुटुंब एसयूव्ही कारमध्ये बसले होते. मुन्नार सोडताना या लोकांनी गुगल मॅपवर नेव्हिगेशन टाकले होते. बुधवारी दुपारी कडूथुरुथी येथील कुरुपंथरा कडवू जवळील एका मोठ्या कालव्यात जवळ आली.
गुगल मॅपनुसार सरळ गेले असते तर तेथे एक मोठा कालवा होता, तर कालव्याच्या आधी एक मोठे वळण देखील होते. गुगलने सरळ जायला सांगितल्यामुळे त्यांने तिकडे वळण घेतले नाही. सरळ गेल्यावर गाडी कालव्यात पोहोचली.
लोकांनी लॉरीतून गाडी काढली
गाडी कालव्यात गेल्याने कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केली. आवाज ऐकून शेजारी असणारे लोक घटनास्थळी पोहोचले आणि एकामागून एक लोकांना कारमधून बाहेर काढण्यात आले.
त्यांने गाडी ओढण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. नंतर कार बाहेर काढण्यासाठी एका लॉरीचा वापर करण्यात आला.