बँकांप्रमाणे आता Google विकणार FD योजना, 1 वर्षाच्या योजनेवर मिळणार एवढे रिटर्नस

आता बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच, Google देखील मुदत ठेव योजना म्हणजेच FD योजना चालवणार आहे.

Updated: Aug 26, 2021, 01:50 PM IST
बँकांप्रमाणे आता Google विकणार FD योजना, 1 वर्षाच्या योजनेवर मिळणार एवढे रिटर्नस title=

मुंबई : आता बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच, Google देखील मुदत ठेव योजना म्हणजेच FD योजना चालवणार आहे. Google भारतातील ग्राहकांसाठी ही विशेष योजना सुरू करणार आहे. ग्राहक Google Pay द्वारे मुदत ठेव FD खरेदी करू शकतील. भारतात हे काम करण्यासाठी गुगलने एका फिनटेक कंपनीशी करार केला आहे.

FD scheme चालवण्यासाठी गुगलने एपीआय सेवा पुरवणाऱ्या फिनटेक कंपनी सेतूशी करार केला आहे. FD ची योजना भारतातील ग्राहकांना फक्त या सेतूच्या API द्वारे दिली जाईल. हा व्यवहार त्यांना Google Pay द्वारे करावा लागेल. Google स्वतःची FD योजना विकणार नाही, परंतु Google Pay द्वारे ग्राहकांना इतर बँकांची FD घेता येईल. सुरुवातीला इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडी ग्राहकांना दिली जाईल.

तुम्हाला किती व्याज मिळेल?

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एफडी 1 वर्षासाठी दिली जाईल. यावर ग्राहकांना जास्तीत जास्त 6.35 टक्के व्याज दिले जाईल. गुगलची ही एफडी योजना घेण्यासाठी ग्राहकाला त्यांचा आधार क्रमांक देऊन केवायसी करावे लागेल.

आधार क्रमांकाच्या आधारावर मोबाईलवर एक ओटीपी येईल. यासाठी 'सेतू'ने API साठी बीटा आवृत्ती तयार केली आहे. त्यावर सध्या काम चालू आहे, जेणेकरून ही योजना लवकरात लवकर सुरू करता येईल.

आता तुम्ही मोबाईल वरून FD घेऊ शकता

ही उत्तम सुविधा पूर्णपणे मोबाईल आधारित असेल. लोकांमध्ये गुगल पेच्या वापराची ज्या प्रकारे वाढ झाली आहे, त्याचा विचार करता Google Payमध्ये  FD योजना चालवणे हा एक मोठा उपक्रम मानला जात आहे.

आता तुम्हाला FD साठी फक्त बँका किंवा बिगर बँकिंग संस्थांवर अवलंबून राहावे लागणार नाही. एफडीसाठी बँकांमध्ये जाण्याची देखील गरज भासणार नाही.

आता हे काम मोबाईलवरून करता येते आणि तेही Google Pay  सारख्या मोबाईल वॉलेटद्वारे. गुगलच्या एफडीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकाचे इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत खाते असणे आवश्यक नाही.

आणखी अनेक बँकांशी चर्चा सुरू आहे

Google च्या FD मध्ये ग्राहकाच्या Google Pay मधून FD मध्ये पैसे जमा केले जातील आणि जेव्हा FD मॅच्यूअर होईल,  तेव्हा त्याचे पैसे ग्राहकाच्या Google Pay खात्यात ट्रान्सफर केले जातील. यामध्ये ग्राहकाचा इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशी नव्हे तर गुगल आणि गुगल पेशी थेट संबंध असेल.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेसोबत देखील Google ची चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्यांची FD देखील गुगल द्वारेही खरेदी करता येतील. जर ही प्रणाली यशस्वी झाली तर ती इतर पेमेंट अॅप्सवरही लागू होऊ शकते.

आजच्या काळात गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतातील लोकांचे सर्वाधिक लक्ष म्युच्युअल फंड आणि स्टॉकवर आहे. परंतु जेव्हा बचतीचा प्रश्न येतो तेव्हा मुदत ठेवी FD सर्वात विश्वासार्ह असतात.

मात्र, FD योजनेमध्ये लाभ उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या दराने लोक बचत खात्यात पैसे ठेवतात. त्यामुळे Googleचा विचार आहे की, लोकांना Google Pay द्वारे FD शी जोडले जाऊ शकते.

7-29 दिवस, 30-45 दिवस, 46-90 दिवस, 91-180 दिवस, 181-364 दिवस आणि 365 दिवसांसाठी FD योजना API च्या बीटा आवृत्तीवर दिली जाईल.

सर्वात कमी दिवस FD साठी 3.5% व्याज आणि 1 वर्ष FD साठी 6.35% व्याज दिले जाईल. एका अहवालानुसार, भारतात Google Pay चे 150 कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत.